गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज.
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील शेतक-यांना दिर्घकालीन सिंचनाची सोय व्हावी यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्च्याचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी सातत्यपुर्ण पाठपुरावा केल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील रंगायपल्ली व रमेश गुडम मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम व चामोर्शी तालुक्यातील राजीव चिचडोह आदि चार उपसा सिंचन योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली अशी माहीती माजी खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पत्रकार परिषदेला ओबिसी महासंघ महाराष्ट्र चे अध्यक्ष बाबुराव कोहळे ‘ रमेशजी भुरसे मानवाधिकार संघटनचे नेते प्रणय खुणे भाजपा उपाध्यक्ष अरुण हरडे शहर अध्यक्ष अनिल कुनघाडकर कामगार मोर्चाचे अध्यक्ष पेटकर उपाध्यक्ष गोवर्धन चव्हाणआदिची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी क्यॉंबिनेटच्या बैठकीत चार उपषा सिंचन गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजुर केल्यात कारण मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतले असुन गडचिरोली जिल्हा शेवटचा नसुन तो पहिला जिल्हा बनविणार आहेत. सिरोचा तालुक्यातील रंगय्यापल्ली उपसा सिंचनाचा १४ गावाला फायदा होईल. रमेशगुंडम उपसा सिंचनांचा पाच गावाला चिचडोह उपसा सिंचनाचा फायदा १४ गावाला तर शांतिग्राम उपसा सिंचनांचा फायदा १५ गावाला होणार आहे एकंदरीत ९५४३ क्षेत्रात फायदा होणार असुन त्यांचा ४८ गावांना फायदा होईल सदर चारही उपसा सिंचन प्रकल्प ७२२. ९५ कोटीचे प्रकल्प आहेत अशी माहीती माजी खासदार अशोक नेते यांनी आपल्या निवासस्थानी घेतेलेल्या पत्रकार परिषदेत माहीती दिली.





