ज्वाला न्यूज
गडचिरोली मुनिश्वर बोरकर मुख्य संपादक
कुरखेडा : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी बांधवांना वनवासी संबोधल्यामुळे आम्ही मुलनिवासी आदिवासी आहोत. वनवासी म्हणणार्या मंत्र्याचा निषेध करण्यासाठी आदिवासी अस्मीतेसाठी उलगुलान व निषेध मोर्चा उद्या दि. ८ जुन २०२६ ला दुपारी १२ वाजता उपविभागिय अधिकारी कार्यालय कुरखेडा येथे भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मागण्या – I) आदिवासी बांधवांना वनवासी म्हटल्यामुळे आदिवासी समाजांच्या भावना दुखावल्यामुळे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर माफी मागावी ( २) भविष्यात वनवासी ऐवजी घटना मान्य आदिवासी शब्दाचा वापर करावा ( 3 ) आदिवासी समाजाच्या अस्मितेचा सन्मान राखावा. ह्या प्रमुख मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी कुरखेडा , आरमोरी , वडसा व कोरचीच्या तमाम आदिवासींनी मोर्च्यात सहभागी होवून आपल्या न्याय हक्कांसाठी एकजुट व्हावे असे आवाहन आरमोरी विद्यानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी केलेले आहे.





