गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज
गडचिरोली – गेल्या आठ दिवसापासुन तस्कर हत्ती गडचिरोली जवळील चांदाळा – मेंढा परिसरात वावरत आहेत दिनांक ८ जुलैला तस्कर हत्ती चांदाळा ते मेंढा रोडकडे जात असताना हत्ती पाहण्याकरीता मेंढा येथील गावकरर्याची गर्दी जमली कुणी दुरवरुन तर कोणी हतीच्या जवळ जावून सेल्फी काढू लागले अश्यातच मेंढा येथील धनराज पुंजीराम मडावी या इसमांनी हत्तीचा जवळ जाऊन सेल्फी काढू लागला अश्यातच चिंतरलेल्या हत्तीने धनराज याला चिरडले त्यामुळे हत्तीच्या हल्यात धनराज मडावी जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मृत्युदेहाचा पंचनामा करून त्याचे प्रेत शवविशेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले अधिक तपास सुरु आहे. वन विभागातर्फे पुकारा देउन जंगलामधे जावू नका हत्तीची शेल्फी काढू नका अश्या सुचना वनविभातर्फे नेहमीच देण्यात येतात परंतु अनेक नागरिक सदर बाबीकडे दुर्लक्ष करतात व अश्या घटना घडतात.





