गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्याला न्युज
गडचिरोली – विश्वास भोवते माजी सभापती जि .प. गडचिरोली तथा माजी मुख्याध्यापक यांचा ६५ वा वाढदिवस महाराष्ट्र विद्यालय वैरागड येथे साजरा करण्यात आला . यानिमित्य शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक आर . डी . उंदिरवाडे, प्रमुख मार्गदर्शक विश्वास भोवते , संस्था सदस्य प्रविण कऱ्हाडे होते .
सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण गीत गायन केले . त्यानंतर विश्वास भोवते माजी सभापती जि . प. गडचिरोली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . त्यानंतर शालेय परिषरात वृक्षारोपन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे संचालन गुलाब वलके यांनी केले तर आभार भोजराज कान्हेकर यांनी मानले .
या कार्यक्रमाला शंकर पटले , राजेश धोबे , राकेश कुंभारे , राजेंद्र मारभते , विशाल चटकी , रतन कऱ्हाडे ,मार्तंड नाहामुर्ते , प्रशांत कऱ्हाडे, नरेंद्र कऱ्हाडे , शुभदा काटवे , वैशाली वैरागडे , ललिता मोटघरे, अंकित घुबडे , साक्षी डांगे व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते .





