Homeभंडाराभंडारा: सखी वन स्टॉप सेंटरमधून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; पोलीस शोधमोहीम...

भंडारा: सखी वन स्टॉप सेंटरमधून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; पोलीस शोधमोहीम सुरू.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

भंडारा: भंडारा येथील सखी वन स्टॉप सेंटर, तकिया वार्ड येथून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसम पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कु. प्राची भागवत टेंभुर्णे असे बेपत्ता मुलीचे नाव असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

नेमकी घटना काय?

प्राची टेंभुर्णे हिला सुयोग्य काळजी घेण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास, कोणत्याही सूचनेशिवाय ती तिथून बेपत्ता झाली. तिला अज्ञात इसमाने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी २ जुलै २०२६ रोजी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

मुलीचे वर्णन आणि ओळख:

नाव: कु. प्राची भागवत टेंभुर्णे (वय १४ वर्षे)

उंची: ५ फूट

रंग: गोरा

बांधा: सडपातळ

केस: काळे भुरकट व लांब

पोशाख: निळ्या रंगाची टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची जीन्स पँट; पायात पावसाळी चप्पल आणि हातात पांढरी घडी

भाषा: मराठी व हिंदी

 

नागरिकांना सहकार्याचे आवाहन:

भंडारा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर सदर मुलगी कोणालाही आढळल्यास किंवा तिच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

१. पोलीस स्टेशन भंडारा: ०७१८४-२५२३०३

२. पो. नि. उल्हास भुसारी: ९८२३७९१६९२

३. पो. उपनि. घनश्याम नवखरे: ८८०५५३७०२०

सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम नवखरे (पोलीस स्टेशन भंडारा) हे करत आहेत.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular