ज्वाला न्यूज
गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज गडचिरोली.
गडचिरोली – दैनिक लोकमत तर्फे दिल्या जाणाऱ्या लोकमत गडचिरोली भुषण पुरस्कार सेंन्टर पांईट हाटेल नागपूर येथे दि. २० जुन २०२६ ला प्राचार्य हेमंत रामटेके व अर्धांगिनी मालाताई हेमंत रामटेके गडचिरोली यांना राज्यमंत्री तथा पालकमंत्री आमदार डॉ. पंकज भोयर वर्धा यांचे हस्ते तर प्रशिद्ध अभिनेता मकरंद अनासपूरे लोकमत चेऑडीटर आशिष जैन संचालक श्रीमंत माने लोकमत नागपूर यांच्या उपस्थितीत लोकमत गडचिरोली भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आकोजी रामटेके कोतवाल पोर्ला यांचे चिरंजिव प्राचार्य हेमंत रामटेके हे शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला चे प्राचार्य असुन पोरला हे त्याचे मुळगाव असुन त्यांनी पोर्ला क्षेत्रातुन प.स. गडचिरोली सदस्य होते तर आता पोर्ला ग्रामपंचायत सदस्य आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत अगदी थोड्या फरकाने निसटता पराभव पत्करावा लागला होता.
प्राचार्य हेमंत रामटेके हे गोरगरीब – रंजल्या गांजल्यांना मदत करण्यात त्यांचा हातखंडा असुन त्यांनी बौध्द बांधवांच्या अनेक विहारांना मदत केली आहे. त्यांचा समाजसेवा फर्डा व्यक्ता व उत्कृष्ठ प्राचार्य म्हणुन दैनिक लोकमत ने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना लोकमत समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले.





