ज्वाला न्यूज
गडचिरोली संपादक मंगेश बन्सोड
गडचिरोली:
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने कथित बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी नगरसेवक आशीष पिपरे यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास गडचिरोली पोलिसांकडून सुरू असून, न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे सांगितले जात आहे.
तपास यंत्रणेकडून बनावट आदेश तयार करण्यामागील उद्देश, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच संबंधित कागदपत्रांचा वापर कुठे व कसा करण्यात आला याचा सखोल तपास केला जात आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, आवश्यकतेनुसार संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.





