Homeगडचिरोलीचांदाळा जांभळी मार्गावर दोन बसची समोरासमोर धडक. एसटी महामंडळाचा बस चालकावर प्रश्नचिन्ह!.

चांदाळा जांभळी मार्गावर दोन बसची समोरासमोर धडक. एसटी महामंडळाचा बस चालकावर प्रश्नचिन्ह!.

ज्वाला न्यूज

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज

गडचिरोली :

गडचिरोली तालुक्यातील अवघ्या ५ कि.मी अंतरावर चांदाळा – जांभळी रोडवर एसटी महामंडळाच्या बसेस ची आमने सामने धडक दिल्यामुळे एस.टी महामंडळाच्या बसेसची नुकसान झाली परंतु दोन्ही बसचे प्रवासी सुखरूप.

आज दि. १७ जुलै २०२६ ला दुपारी १२. 30 च्या दरम्यान गडचिरोली आगाराची बस गडचिरोली ते जांभळी जात होती तर दुसरी बस जांभळी वरून गडचिरोली येत असतांना समोरा समोर दोन बसची टक्कर झाल्यामुळे दोन्ही बस चे नुकसान झाले परंतु प्रवासी मात्र सुखरुप होते. बसेसचा आमने सामने धडक बसल्यामुळे बघ्याची गर्दी झाली होती. चांदाळा जांभळी रस्ता अरुंद व चिखलमय झालेला असुन रस्त्यात अनेक खड्डे पडले आहेत त्यामुळे सदर प्रकार घडल्याची दाट शक्यता आहे.ट्रक ची बसला धडक हा प्रकार नेहमीच ऐकण्यात येत होता परंतु बसची एकमेकांस धडक म्हणजे चांदाळाची मदिरा तर नसेल ना ! अशी अपघात स्थळी खमंग चर्चा होती.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular