गडचिरोली – ज्वाला न्युज.
गडचिरोली -बिरसा मुंडा यांची जल जंगल जमीनीची लढाई हीच वर्तमानातही खरी लढाई आहे.मात्र विषमतावादी व्यवस्था नव्या समस्या आदिवासींमध्ये निर्माण करून एकमेकांच्या विरोधात संघर्ष उभा करण्याचे काम करत आहे.ख्रिश्चन धर्माचे पालन करीत असलेल्या आदिवासींचे आरक्षण रद्द करण्याची मागणीचे ग्रामसभा मार्फत ठराव घेण्यास यशस्वी झाले आहेत.तेव्हा हा षडयंत्र हाणून पाडला पाहिजे.पेसा कायद्यानुसार आदिवासींना स्वायत्त अधिकार मिळाले आहेत त्याची नीट अंमलबजावणी केली जात नाही. महिला सुरक्षा,शिक्षणाचे अधिकार, मुलभूत अधिकारापासुन अजुनही आदिवासी वंचित आहेत.यासाठी महाराणी दुर्गावती यांची प्रेरणा घेऊन स्त्रीयांना पुढे यावे लागेल असेही त्या म्हणाल्या. भंडारा येथे आयोजित आदिवासी समाज मेळावा व बलिदान प्रेरणा दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह उद्घाटनप्रसंगी कुसुमताई अलाम राष्ट्रीय समन्वयक आदिवासी कांग्रेस कुसुमताई अलाम गडचिरोली बोलत होत्या.यावेळी माजी सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे साहेब,एस बी भलावी साहेब माजी ए सी एफ वनसेवा नागपूर, बहुजन सौरभ च्या संपादिका संध्याताई राजुरकर, डॉ प्रकाश शेळमाके राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर तथा अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.





