Homeअहेरीअहेरीतील कर निर्धारण अधिकारी मारहाण प्रकरणात  काँग्रेसचे प्रदेश महासचिव  डॉ. अजय कंकडालवारांसह...

अहेरीतील कर निर्धारण अधिकारी मारहाण प्रकरणात  काँग्रेसचे प्रदेश महासचिव  डॉ. अजय कंकडालवारांसह चौघे ताब्यात.

ज्वाला न्यूज

अहेरी | प्रतिनिधी

अहेरी नगर पंचायतीचे कर निर्धारण अधिकारी वैभव पांढरे यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. अजय कंकडालवार यांच्यासह चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपींना सेमाना (जि. गडचिरोली) परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते.

 

वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या प्रकरणाची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानंतर डॉ. कंकडालवार आणि इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

 

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात जाऊन लपण्याची संधी असताना डॉ. अजय कंकडालवार हे गडचिरोलीकडे का निघाले होते, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांच्या हालचालींमागील नेमके कारण काय होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular