गडचिरोली मुनिश्वर बोरकर संपादक
गडचिरोली – भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे प्रमुख अण्णा हजारे यांचे कट्टर समर्थक , गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक डॉ. विश्वनाथ कुंभारे यांचे दिर्घ आजाराने दि. २८ एप्रिलला निधन झाले व सायंकाळी ६ वाजता कठाणी नदीघाटावर अंतसंस्कार करून त्यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत श्रध्दांजली वाहण्यात आली व शोकसभा घेण्यात आली.
शोकसभेचे अध्यक्ष अखिल भारतिय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी चे धर्माधिकारी लक्ष्मणराव गभे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. शोकसभेलाआमदार डॉ. मिलिंद नरोटे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी डॉ. अनंता कुंभारे माजी जि.प सदस्य अँड. राम मेश्राम कांग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे जग्गनाथ पा. बोरकुटे प्रा. राजेश कात्रटवार माजी आमदार हिरामण वरखडे निरंजन वासेकर पंडित पुडके चंदु पा. मारकवार डॉ. अनिल रुढे डॉ. प्रविण किलनाके भाजपाचे अध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे अभारिपचे रोहिदास राऊत वंचितचे बाळू ठेंभुर्णे नगरसेवक सतिश विधाते आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर बामसेफचे भोजराज कान्हेकर जि.के बारसिंगे प्रमोद राऊत अँड. संजय ठाकरे प्रा. हेमंत रामटेके सुजित राऊत प्रा. अनिल घामोडे बसपाचे प्रा. भाष्कर मेश्राम प्रा. अनिल शेट्टे हंसराज उंदिरवाडे अरविंद ठाकरे प्रमोद राऊत तुळसिराम सहारे आदि सहीत सर्वपक्षीय व गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. संचलन ग्रामगीता चार्य बंडुपंत बोडेकर यांनी केले.





