मुख्य संपादक’ मुनिश्वर बोरकर
सिरोंचा – भूमी अभिलेख सिरोंचा येथे उप अभिलेख पद रिक्त होते याचा पदभार मुलचेरा भूमी अभिलेख कडे तात्पुर्ता सोपविण्यात आलेला होता त्यामुळे सिरोंचा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये उप अभिलेख हे आठवळ्यातुन एकदाच हजर राहतच होते त्यामुळे कास्तकारांची गैरसोय होत होती.
सिरोंचा भूमी अभिलेख कार्यालयाला कायमस्वरूपी भूमी अभिलेख देण्यात यावे अश्या मागणीचा पाठपुरावा आरपीआयचे सिरोचा प्रमुख शंकर अण्णा सोनिगारपू यांनी वांरवार उप संचालक भूमी अभिलेख नागपूर यांचेकडे तक्रार केली होती त्यामुळे उप संचालक भूमी अभिलेख नागपूर यांनी आरपीआयच्या तक्रारीचे गार्भीय लक्षात घेऊन मुलचेरा भुमी अभिलेख कार्यालयातील उप अधिक्षक चवरे यांचेकडे पदभार दिल्यामुळे आता कास्तकारांची कामे सुरळीत होतील अशा विश्वास आरपीआयचे प्रमुख शंकर अण्णा सेनिगारपु सिरोंचा यांनी व्यक्त केला.





