Homeगडचिरोलीस्मार्ट मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय बसवता येणार नाही – मंगेश बन्सोड युवा तालुकाधक्ष.

स्मार्ट मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय बसवता येणार नाही – मंगेश बन्सोड युवा तालुकाधक्ष.

ज्वाला न्यूज

गडचिरोली:

स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांमध्ये विविध अफवा पसरत असताना, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महावितरणने स्पष्ट भूमिका मांडली आहे की प्रीपेड स्मार्ट मीटर बसविणे हे ग्राहकांसाठी बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. ग्राहकाची संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवता येणार नाही, असे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

याबाबत आजाद समाज पार्टीचे युवा तालुकाध्यक्ष मंगेश बन्सोड यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी “४८ तासांत स्मार्ट मीटर बसवला जाईल” अशा प्रकारचे संदेश पाठवून नागरिकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. मात्र, कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी ग्राहकाच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने मीटर बदलू शकत नाही.

 

मंगेश बन्सोड यांनी नागरिकांना आवाहन केले की, मीटर बदलण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी, कोणत्याही दबावाला बळी पडू नये आणि जबरदस्ती झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.

 

“आपले हक्क जाणून घ्या, जागरूक राहा आणि इतरांनाही जागरूक करा,” असे आवाहनही मंगेश बन्सोड यांनी केले.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular