Homeगडचिरोलीधानोरा कांग्रेसचे ललित बर्च्छा ११ नगरसेवकासोबत झाले भाजपवासी. कांग्रेसला धानोरा तालुक्यात खिंडार....

धानोरा कांग्रेसचे ललित बर्च्छा ११ नगरसेवकासोबत झाले भाजपवासी. कांग्रेसला धानोरा तालुक्यात खिंडार. काहीही फरक पळणार नाही कांग्रेस अध्यक्ष कोवासेची प्रतिक्रिया.

ज्वाला न्यूज.

गडचिरोली मुनिश्वर बोरकर

गडचिरोली – कांग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणारा व धानोरा नगरपंचायत कांग्रेसच्या हाती असतांना अचानक कांग्रेसचे जेष्ठ नेते तथा धानोरा नगरपंचायतचे उपाध्यक्ष ललित बर्च्छा आपल्या ११ नगरसेवका सोबत भाजपात प्रवेश करून राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपाचा कमळ दुप्पटा बांधला. ललित बर्च्छा यांच्या ११ नगरसेवक पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे माजी आमदार डॉ. देवराव होळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आदि हजर होते. यांनीच बर्च्छा यांच्या प्रवेश प्रवेशाबाबत शिहाचा वाटा असल्याचे बोलल्या जात आहे.

उपाध्यक्ष ललित बर्च्छा यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे धानोरा नगर पंचायत मधे कांग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. विश्वजित कोवासे यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर धानोरा तालुक्यात कांग्रेसला काहीही फरक पडणार नाही. काही लोक आपली पोळी भाजण्याकरीता जात असतात असे ते म्हणाले.

धानोरा तालुक्यात कांग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपात प्रवेश केल्यामुळे कांग्रेसला मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलल्या जात असुन कांग्रेस पक्ष सुद्धा नव्याने कार्यकारणी बनविण्याच्या तयारीत असल्याचे कळते. कांग्रेसचे नेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक ललित बर्च्छा हे होते. यापूर्वी कांग्रेसचे काही कार्यकर्ते भाजपवासी झाले तेव्हा लालित बर्च्छा हेच भाजपावर टिका करीत होते. आता तेच भाजपवासी झाल्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कांग्रेसमधे चिंतेचा विषय बनला आहे. बर्च्छा सहीत ११ नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा फायदा होणार आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular