ज्वाला न्यूज
कसारी तु.:
कसारी तुकुम येथे सार्वजनिक महिला गणेश उत्सव मंडळ, कासारी यांच्या वतीने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा पारंपरिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ढोलकीच्या तालावर भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पारंपरिक वाद्यांच्या साथीने निघालेल्या विसर्जन मिरवणुकीने परिसराचे लक्ष वेधून घेतले. महिला मंडळाच्या या आगळ्यावेगळ्या विसर्जन सोहळ्यामुळे परंपरा, भक्ती आणि महिला सहभागाचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!” अशा जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.





