Homeछत्तीसगडछत्तीसगड हादरले: वाळू माफियांकडून भाजप नेत्याची कार पेटवून हत्या, तिघांचा दुर्दैवी अंत.

छत्तीसगड हादरले: वाळू माफियांकडून भाजप नेत्याची कार पेटवून हत्या, तिघांचा दुर्दैवी अंत.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

रायपूर:

छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळी फासणारी घटना समोर आली आहे. वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या वादातून भाजपचे नेते व माजी पदाधिकारी भारत सिंह ऊर्फ लाला सिंह यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी नियोजित कट रचत भारत सिंह यांची फॉर्च्युनर कार दोन ट्रकच्या मधोमध अडकवली, जेणेकरून त्यांना पळून जाण्याची संधी मिळू नये. त्यानंतर अत्यंत निर्दयीपणे कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्यात आली. या भीषण घटनेत भारत सिंह यांच्यासह कारमधील तिघांचा जळून मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण कोरिया जिल्ह्यात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. वाळू माफियांची मुजोरी आणि राजकारण्यांवरील हा हल्ला प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या भयंकर प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular