संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली – चामोर्शी तालुक्यातील पोलीस मदत केंद्र घोट येथे पर्यावरण दिन दि. ५ जुन २०२६ ला संपन्न झाला.
याप्रसंगी घोट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर शिंदे तसेच घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण दिन संपन्न झाला. झाडे लावा झाडे जगवा हा नारा देत रॉली काढण्यात आली तर पर्यावरणाचे समतोल कसे राखल्या जातील या बाबतही माहीती देण्यात आली.
पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमास घोट चे प्रतिष्ठीत नागरिक सरपंच रुपाली दुधवावरे भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष अशोक तमंसु अध्यक्ष दिनकर लाकडे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असिफ सय्यद माहिती अधिकार पत्रकार सेनच्या जिल्हाध्यक्ष रुम्पा शहा उर्मिला लिना विश्वास पत्रकार हेमंत उपाध्ये पांडुरंग कांबळे बबीता शहा यांच्यासह पोलीस विभाग व वनविभागाचे कर्मचारी गावकरी आणि पर्यावरणप्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.





