Homeकसनसुरपावसाच्या पाण्याने भरलेला नाला पार करत गरोदर मातेला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिके पर्यंत आणून...

पावसाच्या पाण्याने भरलेला नाला पार करत गरोदर मातेला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिके पर्यंत आणून प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर येथे केली सुखरूप प्रसूती*.

ज्वाला न्यूज

कसनसूर –

दुर्गम व अतिसंवेदनशील भागातील कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कोईंढूळ येथील गरोदर माता श्रीमती पुष्पा सुनिल परसा (वय ३० वर्षे) यांना २० जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२:०० वाजताच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला कुटुंबीयांनी स्थानिक पुजारी व दाई यांच्याकडून प्रसूती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळी ५:०० वाजता स्थानिक आशा स्वयंसेविका कु. निर्मला नरोटे यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ए.एन.एम. (ANM) श्रीमती वसुंधरा मसराम यांच्याशी संपर्क साधला.

घटनेचे गांभीर्य ओळखून ए.एन.एम. वसुंधरा मसराम यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्योत बावणे यांच्याशी संपर्क साधून रुग्णवाहिका (Ambulance) मागवून घेतली. सकाळी ५:१० वाजता कसनसूर येथून रुग्णवाहिका निघाली. कसनसूर ते कोईंढूळ हे अंतर १२ किमी असून, सकाळी ५:४५ वाजता रुग्णवाहिका कोईंढूळ नाल्याजवळ पोहोचली. परंतु, नाल्याला पाणी असल्याने रुग्णवाहिका नाल्याच्या पलीकडे जाऊ शकली नाही.

अशा अत्यंत कठीण परिस्थितीत आरोग्य कर्मचारी ANM वसुंधरा मसराम, ANM चंद्रकला सिडाम, MPW शरलेश मट्टामी व गावकऱ्यांनी मिळून नाल्यापलीकडून २ किमी अंतर चालत जाऊन मातेला स्ट्रेचरवरून नाल्यापर्यंत आणले आणि सुरक्षितपणे रुग्णवाहिकेत बसवले.

सकाळी ६:४० वाजता रुग्णवाहिका कसनसूर आरोग्य केंद्राकडे रवाना झाली.

सकाळी ७:३० वाजता रुग्णवाहिका कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचली आणि वैद्यकीय पथकाने तात्काळ उपचार सुरू करून सकाळी ७:४० वाजता मातेची सुखरूप प्रसूती केली. मातेने कन्यारत्नाला (Female Child) जन्म दिला असून बाळाचे वजन २.१०० किग्रॅ (२ किलो १०० ग्रॅम) आहे.

 

मातेची आधीची प्रसूती सिझरियन (Previous LSCS) झालेली असतानाही आरोग्य पथकाच्या तत्परतेमुळे प्रसूती सुरक्षित पार पडली. त्यानंतर बाळाचे वजन कमी असल्याने पुढील उपचारासाठी सकाळी ८:०० वाजता माता व नवजात बालकाला सामान्य रुग्णालय, गडचिरोली (GCH Gadchiroli) येथे हलविण्यात आले.

*घटनास्थळी व प्रसूती समयी

*डॉ. प्रज्योत बावणे (वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र कसनसूर

श्रीमती वसुंधरा मसराम (ANM)

श्रीमती चंद्रकला सिडाम (ANM)

* श्री. शरलेश मट्टामी (MPW)

* कु. निर्मला नरोटे (आशा स्वयंसेविका) आदिचे मोलाचे सहकार्य लाभले

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular