Homeगडचिरोलीजनगणनेतील पहिल्या टप्प्यात ओबीसींची गणना करा - राष्ट्रीय पिछड़ा वर्ग (ओबीसी) मोर्चा...

जनगणनेतील पहिल्या टप्प्यात ओबीसींची गणना करा – राष्ट्रीय पिछड़ा वर्ग (ओबीसी) मोर्चा ची मागणी .     जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन .

ज्वाला न्यूज

मुख्य संपादक मुनिश्वर बोरकर

गडचिरोली – जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर जनगणना व त्या घरात कोणत्या प्रवर्गाचे लोक राहतात याची नोंद सुरू आहे . यात एससी . एसटी . व अन्य असे तीन कॉलम आहेत . ओबीसींचा कॉलम नाही . याचा अर्थ ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही . ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले .

ही घर जनगणना मोबाईलवर एचएलओ ॲपवर डिजीटल स्वरूपात होत आहे . नोंदीची प्रत दिल्या जात नाही . त्यामुळे नोंदीवर लोकांचा विश्वास नाही . तसेच मिळणाऱ्या आकडेवारीवर विश्वास राहणार नाही . म्हणून ही घर जनगणना पारदर्शी करावी तसेच नोंदीची प्रत प्रत्येकाला देण्यात यावी जेणेकरून जनगणनेवर जनतेचा विश्वास बसेल .

तसेच नीट पेपर फुटी प्रकरणातील चौकशी निष्पक्ष व पारदर्शी करावे , दोषीवर कठोर कार्यवाही करावे व शिक्षण व्यवस्थेत पारदर्शी सुधारणा करावे .

मागण्या पूर्ण न झाल्यास २२ जुनला राष्ट्रव्यापी रॅली प्रदर्शन करण्यात येईल असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले .

निवेदन देतेवेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , भारत मुक्ति मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत , बहुजन मुक्ति पार्टीचे उपाध्यक्ष डोमाजी गेडाम , सचिव खेमचंद इंदूरकर , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे , ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव येलेकर , ओबीसी नेते हरिदास कोटरंगे , जीवनदास भोयर , योगेश सोनुले , गिरिष भोयर , प्रकाश परसोडे , डंबाजी गेडाम , गौतम दुर्गे आदि उपस्थित होते .

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular