Homeआरमोरीआरमोरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १५ लाख ६५ हजार १८० रुपयांचा अवैध देशी-विदेशी...

आरमोरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १५ लाख ६५ हजार १८० रुपयांचा अवैध देशी-विदेशी दारू साठासह चारचाकी वाहनही केला जप्त.

 

⭕ पण….??? एका मॅडमने त्याची दारू का❓ पकडले, असे का म्हटले. या बाबत सर्वत्र चर्चा?.

 

गडचिरोली -चक्रधर मेश्राम .ज्वाला न्युज

आरमोरी –

गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस पथकाने आरमोरी येथील इलेक्ट्रीक च्या दुकानातुन अवैध दारूचा साठा पकडून धडक कारवाई केली.

या धडक कारवाईची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे . मुख्य आरोपी हा सुनील जिभकाटे असुन यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन मुख्य आरोपी आरमोरी येथील शेगाव टोली परिसरातील रहिवासी सुनील जिभकाटे याच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर कारवाई ही गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. आरोपीने आरमोरी येथील बीएसएनएल (BSNL) टॉवरजवळ असलेल्या आपल्या इलेक्ट्रिक सामानाच्या गोदामात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा करून ठेवला होता. या आरोपी कडील असा साठा यापूर्वीही असावा परंतु पोलीसांना आताच कसा एवढा साठा मिळाला. याचे आश्चर्यच नव्हे तर पोलिसावर शंसय व्यक्त होत आहे. सदर आरोपी हा दारू विक्री व्यवसाय करण्यासाठी परिसरात प्रसिद्ध असल्याची चर्चा सुरू असुन अनेक बड्या…बड्यांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत गुप्त माहिती मिळताच नव्हे तर धाड टाकावी म्हणुन आरमोरी पोलिसांनी ईलेक्ट्रॉनिक सामानाच्या गोदामावर छापा टाकून तिथून अवैध देशी, विदेशी आणि हातभट्टीची मोहा दारू जप्त केली. यासोबतच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे चारचाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले.एकूण किंमत जप्त केलेल्या दारू साठ्याची आणि वाहनाची एकूण किंमत १५ लाख ६५ हजार १८० रुपये आहे. आरमोरी परिसरातील इतर अलीकडील कारवाया मोठ्या कारवाई व्यतिरिक्त, आरमोरी पोलिसांनी तालुक्यात इतरही ठिकाणी अवैध दारूची वाहतूक रोखली पाहिजे अशा जनतेचा कयास आहे. आरमोरी पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे त्याबदल आरमोरी पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. असे अनेक बडे मासे आजही आरमोरी तालुक्यातील वैरागड, कढोली भागात खुलेआम दारू पुरवठा करित आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर १० जून च्या रात्री आरमोरी पोलिस स्टेशन हद्दीतील सुनील जिभकाटे यांच्या मालकीच्या गोदामाची झडती घेऊन मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्यात विदेशी दारू , देशी दारू, बिअर आणि हातभट्टीच्या मोहाच्या दारुचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये अट्टल दारू बिझनेसच्या भरवशावर अनेक बड्या… बड्या डमींना हाताशी घेऊन अनेक व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपयांची माया जमा केल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. सुनील जिभकाटे हा मागील अनेक वर्षांपासून या अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेला असुन अनेक लहान – लहान दारू व्यवसाय करणाऱ्यांना पुरवठा करित असल्याची चर्चा सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात आर. एस, व्हिस्की, देशी संत्रा, राॅयल चॅलेंज प्रिमियम , किंगफिशर, लंडन प्रिन्सलर, ६० लिटर मोहाची दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एम. एच 34 ए. एम 8969 ही मारुती सुझुकी स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे करित आहेत. या मोहिमेत पोलीस निरीक्षक कैलास गवते, पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे , पोलीस हवालदार रजनीकांत पिल्लेवान, वालदे , पोलीस शिपाई कुमोदी रामटेके, आभारे वाहन चालक नाईक आदीसह आरमोरी पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली.

सदर अवैध दारू अड्यावर पोलिसांनी यशस्वी धाडसी धाड टाकून लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला असला तरी त्याचा….. माल का ❓पकडला?? कसा काय पकडले असे बोलणाऱ्या मॅडम कोण? हा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.. असे बोलण्याचा उद्देश तरी काय❓ हा प्रश्न दारूबंदी असलेल्या पोलीस प्रशासनासमोर खंबीरपणे उभा आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular