Homeगडचिरोलीआरमोरीत तहसील कार्यालयामागे २९ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या.

आरमोरीत तहसील कार्यालयामागे २९ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या.

संपादक : मंगेश बन्सोड

आरमोरी:

येथील तहसील कार्यालयाच्या मागील वस्तीत राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाने आज रविवारी सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मयूर तुकाराम सोनकुसरे (वय २९ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयूर हा तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहासमोरील परिसरात वास्तव्यास होता. आज सायंकाळी त्याने आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत फाशी घेतली.

 

मयूरच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्याचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ऐन तारुण्यात मुलाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू

आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular