ज्वाला न्यूज
आरमोरी : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मेजा–आरमोरी येथे भव्य उत्सव सोहळा तसेच प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला असून, साई दामोदर मंगल कार्यालय, वडसा रोड, बर्डी आरमोरी येथे कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, इतिहास आणि सामाजिक एकतेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. मा. रामदासजी मसराम यांचे शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत.
📍 स्थळ : साई दामोदर मंगल कार्यालय, वडसा रोड, बर्डी आरमोरी
📅 दिनांक : रविवार, ९ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी १० वाजता





