Homeगडचिरोलीराशनमध्ये गहू बंद करून मक्का देणे थांबवा; नागरिकांना गहूच द्या – आजाद...

राशनमध्ये गहू बंद करून मक्का देणे थांबवा; नागरिकांना गहूच द्या – आजाद समाज पार्टीचे युवा तालुकाध्यक्ष मंगेश बन्सोड यांची मागणी.

ज्वाला न्यूज

गडचिरोली | प्रतिनिधी :

शासनाने सार्वजनिक वितरण प्रणाली (राशन) अंतर्गत गव्हाऐवजी मक्का देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश नागरिकांच्या दैनंदिन आहारात पोळी-भाजी हा प्रमुख आहार असल्याने गव्हाऐवजी मक्का देणे व्यवहार्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

 

आजाद समाज पार्टीचे युवा तालुकाध्यक्ष मंगेश बन्सोड यांनी शासनाकडे मागणी करत म्हटले की, “राशन दुकानांमधून नागरिकांना गव्हाऐवजी मक्का दिली जात आहे. अनेक कुटुंबांना मक्केचा उपयोग कसा करावा, याची माहिती नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हा निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे गव्हाचे वितरण सुरू करावे.”

 

तसेच, नागरिकांच्या आहाराच्या सवयी लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये गव्हाचा नियमित पुरवठा करण्यात यावा, अशीही त्यांनी शासनाकडे मागणी केली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular