Homeकल्याणडॉक्टरांना मारहाण; संतप्त डॉक्टरांचे कामबंद आंदोलन.

डॉक्टरांना मारहाण; संतप्त डॉक्टरांचे कामबंद आंदोलन.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

कल्याण : शिंदे गटाच्या शिवसेनेचे कल्याण-डोंबिवली येथील नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तसेच महिला डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.

 

घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी निषेध म्हणून कामबंद आंदोलन पुकारले. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

कामबंद आंदोलनामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असून, रुग्णांनाही याचा फटका बसत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर संघटनांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular