ज्वाला न्यूज
गडचिरोली – ज्वाला न्युज
गडचिरोली NAvyA scheme अंतर्गत प्रशिक्षणार्थी व ट्रेनर विद्यार्थांना हजेरी कमीच्या नावाखाली त्यांना परिक्षेस बसण्यास वंचित ठेवण्याचा प्रकार आयटिआय कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी विध्यार्थांना सुरु असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
परंतु सदर विध्यार्थीनीचे वास्तव वेगळेच असुन प्रथम दिड महिण्याचा कोर्स आहे असे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी जमविण्यात आले सदर बॅचच्या विध्यार्थिनीनी दिड महिना हजेरी लावली कोर्स पुर्ण केला नंतर चार महिण्याचा कोर्स सागण्यात आले बाहेर गावच्या विद्यार्थीनी उन्हाळाअसल्यामुळें साडेसात वाजता पोहचणे कठीण झाले सोबतच गरीब विद्यार्थिनीकडे मोबाईल नाही त्यामुळे प्रशिक्षणास जाणे कठीण झाले सोबतच तिन – चार बॅचेस घेण्यात येत होते. दि. 3 जुलै २०२६ ला परिक्षा असतांना सदर प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनीना गैरहजर चे कारण दाखवून त्यांना परिक्षेला उपस्थित राहता येणार नाही असे सांगण्यात आले. तेव्हा सदर प्रशिक्षणार्थींचे वर्ष वाया जाणार आहे.
आदिवासी जिल्हयांची बाब व बस तसेच मोबाईलच्या अडचणीची बाब लक्षात घेऊन त्या विध्यार्थीनीना परिक्षेस बसण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून त्यांचे वर्ष वाया जाणार नाही त्या करीता रिपाई जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ठ मंडळानी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
सदर शिष्ठ मंडळात निवेदन देतांना आरपीआय अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या सोबत प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी गौरी रविद्र मेश्राम दिव्याताई नरेंद्र टिकले सौदर्या शरद लोणारे तृप्ती कोलकोंडावार भैरवी सत्यवान बारसागडे प्रतिज्ञा नरेश रिंगुसले कल्याणी मुकेश किरमे मंजुषा देविदास भोयर





