ज्वाला न्यूज
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
मराठवाडा : काल दिनांक १० जुन २०२६ ला सकाळी ११.०० वाजता ठरल्याप्रमाणे (अनुसूचित जाती एकता समीती च्या वतीने” बंदर आयोग रद्द करा व अनुसूचित जाती उपवर्गीकरन च्या नावावर ५९ जातीत भांडणं लावणारा उपवर्गीकरन निर्णय रद्द करा” यासाठी आरक्षणाचे जनक
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी, दिनांक 26.6.2026 आझाद मैदान मुंबई ते मंत्रालय मुंबईवर निघना-या मोर्चात सहभागी होण्यासाठी)बीड येथुन आंबेडकरी निळे वादळ हे औरंगाबाद, अहमदनगर, भिमा कोरेगाव ते पुणे मुंबई च्या दिशेने पायदळ लांगमार्च करत निघाले,
यावेळी आंबेडकरी जनतेत प्रचंड उत्साह व ऐक्य बघायला मिळाले, ह्या महामोर्चात मराठवाडा येथुन ४ लक्ष आंदोलक आझाद मैदान येथे पोहचण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली,
या महामोर्चात आझाद मैदान येथे दिनांक 26 जुन रोजी पोहचण्यासाठी आंबेडकरी जनता बस,कार,रेल्वे,पायदळ,खाजगी बसेस इत्यादी द्वारा मोर्चात मोठ्या प्रमाणात अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालयाने अतीरीक्त रेल्वे व बस गाड्यांची व्यवस्था करावी असे आवाहन”अनुसूचित जाती एकता समीती” मुख्य मार्गदर्शक भिमराव यं.आंबेडकर(अध्यक्ष समता सैनिक दल) यांनी केले व अनुसूचित जाती एकता समीतीच्या वतीने ५९ जातीच्या आंदोलनात सर्वं समाज बांधवांचे आभार मानले.





