Homeछत्रपती संभाजीनगरतुकाराम मुंडे यांच्या पथकावर जीवघेणी हल्ला ;महिला अधिकाऱ्याला भरधाव स्कॉर्पिओने उडवण्याचा प्रयत्न...

तुकाराम मुंडे यांच्या पथकावर जीवघेणी हल्ला ;महिला अधिकाऱ्याला भरधाव स्कॉर्पिओने उडवण्याचा प्रयत्न .

ज्वाला न्यूज

छत्रपती संभाजीनगर:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गुटखा माफियांची मुजोरी आता पराकोटीला पोहोचली आहे. वाळूज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या पथकावर गुटखा माफियांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक निर्देशानंतर, ९ जून रोजी पहाटे पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे एका आयशर ट्रकला अडवून तपासणी केली असता, त्यात तब्बल २५ पोती प्रतिबंधात्मक गुटखा आणि पानमसाला आढळून आला. या कारवाईनंतर पथक पोलिस संरक्षणाची वाट पाहत असतानाच, अचानक एका विनाक्रमांक काळ्या स्कॉर्पिओमधून ५ ते ६ गुंड तिथे दाखल झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली.

यावेळी गुंडांनी थेट महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष करत, त्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, प्रज्ञा सुरसे यांनी अत्यंत प्रसंगावधान राखून बाजूला उडी मारल्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. या गोंधळाचा फायदा घेत गुंडांनी जप्त केलेला गुटख्याचा ट्रक पळवून नेला. या धक्कादायक घटनेनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, वाळूज पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि धमकावल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, पळून गेलेला ट्रक आणि इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular