Homeबीडअवैध संबंधातून पतीचा खून: पत्नीसह प्रियकर आणि मित्राला अटक.

अवैध संबंधातून पतीचा खून: पत्नीसह प्रियकर आणि मित्राला अटक.

ज्वाला न्यूज

बीड/नेकनूर:

बीड जिल्ह्यातील लिंबागणेश येथील अंजनावती रस्त्यावर १ जून रोजी किरण बंडू सोनवणे (वय २७) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, नेकनूर पोलिसांनी तपास केला असता, हा अपघात नसून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केलेल्या पतीचा खुनाचा थरार असल्याचे समोर आले आहे.

 

खुनाचा घटनाक्रम:

कटाची सुरुवात: मृत किरणची पत्नी प्रियंकाचे दीड महिन्यांपूर्वी दसरथ परदेशी याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. किरण तिला त्रास देत असल्याने, प्रियंका आणि दसरथने त्याचा काटा काढण्याचे ठरवले.

 

दिरजचा सहभाग: दसरथने आपला मित्र धीरज येडे यालाही या कटात सामील केले. ३ जून रोजी दसरथने धीरजला लिंबागणेश येथे आणून दारू पाजली आणि नशेत असताना त्याला खुनाच्या कटात सहभागी करून घेतले.

खुनाची अंमलबजावणी: ३ जून रोजी रात्री दसरथ, धीरज आणि किरण दुचाकीवरून जात असताना, एका निर्जन स्थळी त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर दसरथने रुमालाने किरणचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून त्याला अपघाती मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.

‘कार्यक्रम ओके’ चा संदेश: खून केल्यानंतर प्रियंका आणि दसरथ यांच्यात फोनवर संवाद झाला आणि ‘कार्यक्रम ओके’ झाल्याची माहिती देण्यात आली.

 

पोलिसांची कारवाई:

अपघाताचा बनाव असूनही, शवविच्छेदन अहवालात गळ्यावर जखमा आढळल्याने पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान पोलिसांनी आधी दसरथ आणि धीरजला अटक केली, त्यानंतर प्रियंकाचाही या खुनात सहभाग असल्याचे समोर आले. मंगेश साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular