ज्वाला न्यूज
गडचिरोली संपादक मंगेश बन्सोड
कसारी (ता. वडसा) येथील रहिवासी कु.रोहित रविंद्र मडावी (वय अंदाजे 24 वर्षे) हा युवक दिनांक 2 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला आहे. घरातून तो पुणे येथे कामासाठी जात असल्याचे सांगून निघाला होता. मात्र त्यानंतर त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नाही.
रोहितची उंची सुमारे 5 फूट 8 इंच, रंग सावळा, शरीरयष्टी सामान्य, केस काळे व कुरळे असून दाढी व मिशी ही त्याची ओळख आहे. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
या युवकाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा तो कुठे दिसल्यास कृपया 8999768577 ,9689490759 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
आपल्या एका छोट्याशा माहितीतून एका कुटुंबाला त्यांचा मुलगा परत मिळू शकतो.





