Homeकुरखेडाकुरखेडा बसस्थानकातील एक पंखा महिनाभरापासून बंद; प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप* 

कुरखेडा बसस्थानकातील एक पंखा महिनाभरापासून बंद; प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप* 

संपादक मंगेश बन्सोड

दि.१६ मे

कुरखेडा बसस्थानक येथे भर उन्हाळ्यात प्रवाशांना उकाड्याचा सामना करावा लागत असून बसस्थानकातील तीन पंख्यांपैकी एक पंखा मागील एक महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याची बाब समोर आली आहे.

 

याबाबत बसस्थानक प्रमुखांना अनेकवेळा तोंडी सूचना व तक्रार करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोली चे हेमंतकुमार मरकाम यांनी केला आहे.

 

सध्या वाढत्या तापमानामुळे बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला, लहान मुले, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक व ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना उष्णतेमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

बसस्थानकातील मूलभूत सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली असून, बंद पंखा तात्काळ दुरुस्त करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular