संपादक मंगेश बन्सोड
आसगांव:
पवनी तालुक्यातील आसगांव येथील बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना येथे थांबणेही कठीण झाले आहे.
बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा अभाव, व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची गैरसोय तसेच बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, बसस्थानकाची तात्काळ दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





