HomeUncategorizedतेंदु पत्ता तोडायला गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ल्या चढवून ठार...

तेंदु पत्ता तोडायला गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ल्या चढवून ठार केले. वडेगाव बांध्या येथील घटना.

संपादक मंगेश बन्सोड

वडेगाव बांधा : मोर अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बांधा परिसरात आज सकाळी हृदयद्रावक घटना घडली. गावातील सौ. कौशल्या रहाटे या नेहमीप्रमाणे जंगल परिसरात तेंदू पत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जंगल परिसरात जाण्यास नागरिक घाबरत आहेत. मागील काही दिवसांपासून या भागात वाघाचा वावर वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

 

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच नागरिकांनी एकटे जंगलात न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रहाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular