Homeगडचिरोलीगडचिरोलीत महिला महाविद्यालयासमोर पोलिसांची धडक कारवाई; विदेशी दारूसह ६७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

गडचिरोलीत महिला महाविद्यालयासमोर पोलिसांची धडक कारवाई; विदेशी दारूसह ६७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

गडचिरोली – मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज

आरोपी गुड्डु खोब्रागडे पोलिसांच्या जाळ्यात; पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप मेश्राम यांनी रचला सापळा.

गडचिरोली -स्थानिक महिला महाविद्यालयासमोर चंद्रपूर-गडचिरोली हायवे रोडवर अवैध रित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमावर गडचिरोली पोलिसांनी आज, १३ जून रोजी सकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ६७,५०० रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला रंगेहात अटक केली आहे. ही यशस्वी कारवाई गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप मेश्राम यांनी पंचांसमक्ष पार पाडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुड्डु दिलीप खोब्रागडे (वय ३० वर्ष, रा. सालईटोला, पो. खरपुंडी, ता.जि. गडचिरोली) हा शनिवार, १३ जून रोजी सकाळी ७:३० ते ८:१५ वाजताच्या सुमारास महिला महाविद्यालया समोरील हायवे रोडवरून आपल्या दुचाकीने अवैध विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत होता.

याबाबत गुप्त माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप मेश्राम व त्यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून संशयित दुचाकीला थांबवले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये (चुंळीत) ‘हायवर्ड ५०००’ कंपनीचे ३० नग बिअरचे टीन मिळून आले. या जप्त केलेल्या दारूची अवैध विक्री किंमत अंदाजे ७,५०० रुपये आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली ६०,००० रुपये किमतीची निळ्या रंगाची सुझुकी एक्सेस दुचाकी (क्रमांक MH ३४ CM ४८२०) पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी एकूण ६७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी गुड्डु खोब्रागडे विरुद्ध गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची यशस्वी कारवाई माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप मेश्राम आणि शुभम शेंडे यांचे पथकाने केली असून सदर कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular