Homeगडचिरोलीठिबक व तुषार सिंचनासाठी आता मिळणार ९० टक्के अनुदान*.

ठिबक व तुषार सिंचनासाठी आता मिळणार ९० टक्के अनुदान*.

ज्वाला न्यूज

*अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला शेतकऱ्यांनी केवळ १० टक्के हिस्सा भरून योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

 

गडचिरोली, दि. १७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा २.० अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) प्रणाली गडचिरोली जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे संपूर्ण रक्कम भरण्याची आवश्यकता राहणार नसून, केवळ १० टक्के लाभार्थी हिस्सा भरून ९० टक्के शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत पात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यापूर्वी संबंधित साहित्य खरेदीसाठी लाभार्थ्यांना १०० टक्के रक्कम स्वतः भरावी लागत होती. त्यामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या मर्यादित शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते. मात्र CBDC प्रणालीमुळे आता केवळ १० टक्के रक्कम भरून उर्वरित अनुदानाची प्रक्रिया सुलभ होणार असून, अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना आधुनिक सूक्ष्म सिंचन सुविधेचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.

 

CBDC प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कृषी विभाग आणि पंजाब नॅशनल बँकेच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत विक्रेत्यांचे (डीलर्स) विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात CBDC प्रणालीची कार्यपद्धती, डिजिटल व्यवहार प्रक्रिया तसेच सर्व नोंदणीकृत विक्रेत्यांचे ऑनबोर्डिंग करण्यात आले.

 

ठिबक व तुषार सिंचनामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर, सिंचन खर्चात बचत आणि पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाचा विस्तार होऊन जलसंधारणासही चालना मिळणार आहे.

 

जिल्ह्यातील सर्व पात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यावा, तसेच अधीक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयात संपर्क करावा.

 

००००

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular