Homeगडचिरोलीगडचिरोली समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश.

गडचिरोली समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश.

ज्वाला न्यूज

गडचिरोली प्रतिनिधी :

गडचिरोली : समाज कल्याण विभाग, गडचिरोली अंतर्गत समाज कल्याण वसतिगृह, विसापूर येथील विद्यार्थ्यांनी नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मलक्का चंद्रया बोरामपल्ली यांनी भारती विद्यापीठ (BVDU) येथे बी.ए. एलएल.बी., तुषार विनायक मिरास यांनी भारती विद्यापीठ (BVDU) येथे बी.ए. एलएल.बी., तर ओंकार बारसागडे यांनी कुमारगुरू कॉलेज ऑफ लिबरल आर्ट्स अँड सायन्स (KCLAS), कोयंबतूर येथे बी.ए. (अर्थशास्त्र) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून यश संपादन केले आहे.

 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आजाद समाज पार्टी, देसाईगंज तालुकाध्यक्ष मंगेश बन्सोड यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे यश संपादन करून जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षाही त्यां

नी व्यक्त केली आहे.

 

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular