मुख्य संपादक :मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : ओबीसींची जातनिहाय जनगणना करावे यासाठी बामसेफ ,आरपिआय ,राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा . मुनिश्वर बोरकर व भारत मुक्ती मोचार्च जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत यांचे नेतृत्वात शहरातील दुकाने बंद करून चौकात निषेध सभा घेण्यात आली .
भारत बंद करण्याच्या मागण्या एससी एसटी ओबीसी यांचे समर्थनातील युजिसी बिल लागू करावे . तसेच २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी पासून मुक्त करावे . ईव्हीएम मशीन बंद करावे बॉयलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा आदि मागण्यासाठी इंदिरा गांधी चौकात घोषणाबाजी करून निषेधसभा घेण्यात आली.
निषेध सभेला भोजराज कान्हेकर प्रा. मुनिश्वर बोरकर प्रमोद राऊत यांनी मार्गदर्शन केले.
निषेध सभेला समय्या पसुला डोमाजी गेडाम हरिदास कोटरंगे दामोधर शेन्डे सुनिल उराडे नामदेव दुधे दिलीप नंदेश्वर जैराम उंदिरवाडे लवकुश भैसारे प्रेमदास रामटेके श्रीरंग उंदिरवाडे खेमदेव हस्ते शिद्यार्थ भानारकर शांतीलाल लाळे अभिषेक कुनघाडकर हेमंत बारसागडे नरेंद् शेन्डे संम्येक भैसारे नेताजी मेश्राम रमेश गजभिये सुनंदा बांबोळकर लता रामटेके विभा खेवले रोजा घागरगुंडे प्रेमलता कान्हेकर मंगला बाबनवाडे पौर्णीमा मडावी सुरभी कुनघाडकर लक्ष्मी गेडाम राणी वासेकर राधिका वासेकर सानिया भैसारे कल्याणी गोंडाणे देवला खोबागडे देवला डोंगरे विशाखा देवतळे आदिसहीत बामसेफ आरपीआयचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.





