मुख्य संपादक: मुनिश्वर बोरकर
गडचिरोली.सम्यक जागृत महिला मंडळ दिक्षाभूमी देसाईगंजच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शदिन सोहळा व बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याचे अनावरण दिक्षाभूमी देसाईगंज येथे बुधवार दि. २९ एप्रिल २०२६ ला सांयकाळी ७ – ०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब २९ एप्रिल १९५४ साली दिक्षाभूमी देसाईगंज येथे येवून पदस्पर्श केले होते तर बॅरि राजाभाऊ खोब्रागडे २७ फरवरी १९५७ साली दिक्षाभूमी वडसा येथे पाच हजार लोकांना बौध्द धम्माची दिक्षा दिली म्हणुन पदस्पर्श दिक्षाभूमी देसाईगंज भव्य असा सोहळा २९ एप्रिलला.
सदर स्पदस्पर्श सोहळा खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उदघाटक माजी मंत्री तथा कांग्रेस नेतेआमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे असुन सहपालक मंत्री अँड. आशिष जयस्वाल यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे.
विशेष अतिथी म्हणुन आमदार डॉ. मिलिंद नरोटे माजी आमदार कृष्णाभाऊ गजभे माजी आमदार डॉ. देवराव होळी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी sDo प्रसेनजित प्रधान वडसा नगराध्यक्ष लताताई सुंदरकर मुख्याधिकारी सतिश चौधरी सुरेंद्रसिंह चंदेल माजी जि.प सदस्य अँड. राम मेश्राम जेष्ठपत्रकार रोहिदास राऊत सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली Rfo कैलास धोंडणे इंजि. विजय मेश्राम जेसा मोटवाणी मारोती जांभुळकर यशवंत जांभुळकर आरमोरी आदि लाभणार आहेत.
कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती प्राचार्य डॉ. देवेश कांबळे ब्रम्हपुरी प्रविण खोब्रागडे चंद्रपूर चंदुराव राऊत वडसा तर स्वागताध्यक्ष म्हणुन आमदार रामदास मसराम मंडळाच्या अध्यक्षा ममता जांभुळकर रात्रौ ९ वाजनाअंजली गडपाले हैद्राबाद आणि संच यांचा भिमगिताचा कार्यक्रम होणार आहे.





