मुख्य संपादक: मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा गडचिरोली च्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक अनिसचे केंद्रिय सदस्य रामभाऊ डोंगरे नागपूर व शांताराम उके नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वैनगंगा हाटेल गडचिरोली येथे पार पडली.
मागील महिन्यात गडचिरोली जिल्हयातील सर्व ५२ आश्रम शाळेत अनिसचा कार्यक्रम झाला होता त्याचा आढावा बैठकीत रामभाऊ डोंगरे यांनी सांगीतले तर सिरोंचा व कोरची या दुर्गम भागातही अनिसची शाखा निर्माण करावयाची आहे तसेच गडचिरोली जिल्हयात वावरत असलेले भोंदु बाबा यांची यादी एस.पी. कडे देण्याचे ठरविण्यात आले.
सदर आढावा बैठकीला अनिस चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर कार्याध्यक्ष चंद्रशेखर भडांगे उपाध्यक्ष भोजराज कान्हेकर डोमाजी गेडाम सचिव प्रमोद राऊत न.प चे माजी सभापती सहारे ‘ माजी जिल्हाध्यक्ष समय्या पसुला नरेंद्र शेंन्डे लवकुंश भैसारे मोरेश्वर निमगडे नेताजी मेश्राम राजुभाऊ वनकर प्रेमदास रामटेके जैराम उदि रवाडे धनराज पाझारे आदिसहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.





