Homeगडचिरोलीजंगली हत्तींचा शेतशिवारात वाढला उपद्रव; धान पिकांचे मोठे नुकसान.

जंगली हत्तींचा शेतशिवारात वाढला उपद्रव; धान पिकांचे मोठे नुकसान.

ज्वाला न्यूज 

गडचिरोली:

चुरमुरा, सूर्यडोंगरी, इंजेवारी पेठ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वन विभागाविरोधात नाराजी

गडचिरोली जिल्ह्यातील चुरमुरा, सूर्यडोंगरी, इंजेवारी पेठ परिसरातील शेतशिवारात जंगली हत्तींचा उपद्रव वाढला असून हत्तींच्या कळपाकडून धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. उभ्या पिकांची नासधूस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

 

हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वारंवार होणाऱ्या या नुकसानीवर वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

हत्तींच्या कळपामुळे नुकसान झालेल्या शेतीची वन विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबरोबरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular