गडचिरोली मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज
गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा ठिकाणापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा पोर्ला येथे देशी विदेशी दारू व पावडर मिश्रित ताडीचे खूप मोठ्या प्रमाणात अवैद्य रीतीने विक्री जोमात सुरू आहे परंतु या अवैद्य दारू विक्री कडे व ताडी विक्री कडे गावातील पोलीस पाटील व महात्मा गांधी तंटामुक्त समिती आणि पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे अवैद्य धंदे चालू असताना पोर्ला चे पोलीस पाटील हे पोलीस स्टेशन ला कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही आहेत असं वाटते या अवैद्य दारू विक्री व ताडी विक्री ला जबाबदार पोलीस पाटील सुद्धा आहेत आणि या बीटचे बिट जमादार हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत या अवैद्य दारू विक्री मागे कोणाचा अभय आहे असा गावकऱ्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे गावातील अल्पवयीन मुले सुद्धा या विषारी ताडी व विषारी दारू च्या आहारी गेलेले दिसून येत आहेत पोर्ला गावाची दारू चालू असल्यामुळे बऱ्याच लोकांचे कुटुंब उध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे गावामध्ये या दारूमुळे तंटे भांडण खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत या अवैद्य व विषारी दारूमुळे पोर्ला गावातील युवा पिढीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ पोर्ला गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई करून गावातील दारू बंद करावी अन्यथा पोर्ला गावातील नागरिक हे रस्त्यावर उतरून गावचे पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन करतील असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.





